क्राईम

रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल !

प्रतिनिधि, पेण

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात अधिकारी असलेला आणि राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध् असलेल्या योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी योगेश पाटील याचे राजकीय पक्षामधील बड्या नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती मिळत आहे.

३० वर्षीय पिडीत तरुणीने पेण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून योगेश बाळकृष्ण पाटील (वय ३१ वर्षे) रा. रावे (ता. पेण) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालवधीत पेण परिसरात घडला आहे. आरोपी हा रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आहे. त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणी सोबत २०१८ साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली, ओळखीचे रुपांतरण मैत्रीत झाले ते दोघे एकमेकांना वारंवार भेटत होते आणि भटीचे रूपांतरण प्रेमात झाले. आरोपी योगेश पाटील याने पिडितेला लग्नाचे अमिष दाखवून २०१८ पासून वारंवार शरीर संबंध ठेवले. पिडितेने एप्रिल २०२१ साली लग्नासाठी योगेश यांच्याकडे विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.

एप्रिल २०२२ साली पिडितेने आत्महत्या करण्याचा ही प्रयत्न केला होता. त्यानंतर पिडितेने योगेश याचेशी बोलने बंद केले होते. तरीही योगेश याने तिला संपर्क करण्यास सुरवात केली. आणि पुन्हा लग्नाचे खोटे आश्वासन देत शरीर सुखाची मागणी करु लागला. ३० ऑगस्ट रोजी पीडित तरुणी वाशी येथील व्हि.एल.सी.सी इन्सिटीट्युट येथे गेली असता आरोपी योगेश पाटील याने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावून शिविगाळ आणि मारहाण केली आणि तिला वाशी येथे सोडून निघुन गेला. आरोपी योगेश पाटील हा आपल्यासोबत लग्न न करता आपला वापर फक्त शरीर सुखासाठी करत आहे हे लक्षात आल्यावर पिडितेने ३० ऑगस्ट रोजी पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी योगेश पाटील यास ३१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल क्रमांक २४५/२०२४ नुसार गुन्हा नोंद झाला असून त्याच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ६९, ३५१ (२), ३५२ या कलमां अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व त्यांना कार्यकर्त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. यामुळेच त्यांची हिंमत महिलांवर अत्याचार करण्याची झाली आहे, अशा या असुरी वृत्तीला ठेचून काढण्याकरिता शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!