श्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम !

अक्कलकोट येथील बुधवार पेठेतिल श्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी (दि. २१) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज अनुप अनिल पुजारी (महाराज) यांनी दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त मठाच्या मुख्य गाभारास व संपूर्ण मठास विविध पुष्पमालेनी व फळ फळावलांनी सजावट करण्यात येणार आहे.

प्रारंभी समाधी मठात रविवारी पहाटे ४.३० वाजता काकड आरती होईल. त्यानंतर स्वामींच्या समाधीस महारुद्राभिषेक, गुरु पाद्यपूजा होणार आहे. या सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी समाधी मठ दिवसभर खुला राहणार आहे. गुरुपौर्णिमे निमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी ११:३० वाजता अनुप महाराज पुजारी व पुजारी परिवारच्यावतीने आणि मान्यवर भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामींना महानैवेद्य दाखवून नैवेद्य आरती होणार आहे. त्यानंतर दिवसभर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी श्री स्वामी समर्थ समाधी मठ भजन मंडळाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अक्कलकोटसह कुरनूर, दहिटणेवाडी, बावकरवाडी येथील कलाकारांची भक्ती गीते सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी श्रीं स्वामी महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ समाधी मठ पुजारी परिवार यांच्या वतीने स्वामी भक्तांना केले आहे.

ताज्या बातम्याभक्तिश्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम !

श्री स्वामी समर्थ समाधी मठात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !

श्री स्वामींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे श्री अनुप गुरुजी यांचे आवाहन राजमुद्रा न्यूज नेटवर्क, अक्कलकोटअक्कलकोट येथील बुधवार पेठेतील श्री

Read More
भक्ति

साईबाबांच्या भव्यदिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन !

ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सलग १६ वर्षे नियोजन. प्रतिनिधि, पेण श्री साई बाबांची मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम

Read More
भक्ति

कोकणातील घरे ही नुसती घरे नाहीत तर ती एक संस्कृती – अजित पितळे

गणपती सजावटीसाठी पुठ्ठ्यापसून बनवले हुबेहुब कोकणातील घर ! अरविंद गुरव, पेण कोकणातील घरे ही नुसती घरे नाहीत तर ती एक

Read More
भक्ति

पेण तालुक्यात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप !

विसर्जन घाटांवर गणेशभक्तांची गर्दी; प्रशासनाची उत्तम तयारी. अरविंद गुरव, पेण पेण तालुक्यातील शहरी, तसेच सर्व ग्रामीण भागात दीड दिवसांच्या गणपतींना

Read More
भक्ति

पर्यावरण पूरक गणेश उत्सव हाच खरा गणेश उत्सव – सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे

डॉक्टर गिरीश गुणे यांच्या घरातील पर्यावरणपूरक गणपती बाप्पा संजय कदम, पनवेल पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला

Read More
भक्ति

श्रीस्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामीसुत यांच्या समाधीची १५० वर्ष-पूर्ती !

संजय नारायण वेंगुर्लेकर, ठाणे-मुंबई मुंबईचे हरिभाऊ दाजीसाहेब तावडे हे संसारी गृहस्थ व त्यांचेच पुढे ‘श्री स्वामीसुत’ नामे महासाधू बनणे हा

Read More
भक्ति

पेण येथे भाजपा सांस्कृतीक सेल तर्फे भजन स्पर्धेचे आयोजन !

आ.रविशेठ पाटील व माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उद्घाटन किरण बांधणकर, पेण पेण विधान सभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी

Read More
भक्ति

स्वामींच्या समाधी मठात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

हजारो भाविकांनी घेतला दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ राजमुद्रा न्यूज़ नेटवर्क – अक्कलकोट अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठात हजारो

Read More
ताज्या बातम्याश्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम !

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे” : मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई – राजमुद्रा न्यूज़ नेटवर्क मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही

Read More
error: Content is protected !!