आदिवासी बांधवांना जातीचे दाखले व कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा उपक्रम

राजेश प्रधान, पेण
पेण तालुक्यातील दुष्मी-खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आणि वडमालवाडी येथील आदिवासी बांधवांना मंगळवार १३ ऑगस्ट रोजी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मिळालेल्या जातीचे दाखले, व पेण तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिव मंदीराच्या सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, सचिव रवींद्र पवार, आदिवासी बांधवांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे, रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता रमेश राठोड, तालुका कृषी विभाग पेन चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नचिकेत जगे, तलाठी सजा दुष्मी-खारपाडाच्या नीता पाटील, पेण तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन जनार्दन निरगुडा, महसूल साहाय्यक अभय नेने, सरपंच नेत्रा घरत, उपसरपंच संजय घरत, सदस्य निशाकर घरत, हिरामण घरत , रसिका ठाकूर,अनिता वाघे, आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमारे, शंकर ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, स्वयंभू मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर, बालग्रामित्र राजू पाटील, स्मिता रसाळ, सचिन पाटील सतीश मोकल आदी मान्यवर उपस्तीत होते.

यावेळी ज्या आदिवासी बांधवांच्या दाखल्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पकडून महसूल विभागाला खर्च दिला जातो त्या सहाय्यक प्रकल्प संचालक विशाल घोरपडे यांनी आदिवासी ग्रामस्थांना जातीच्या दाखल्यांचे महत्व व उपयुक्त योजना यावर मार्गदर्शन करताना ग्राम सवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यचे कौतुक केले. तर सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी समोरून एक पाऊल पुढे येणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत ग्राम संवर्धन सामाजिक संस्था नेहमीच असेल असा विश्वास व्यक्त केला. सदर दाखले काढण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांनी आभार व्यक्त करताना प्रलंबित असलेले दाखले लवकरात लवकर बनवून देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालग्राम मित्र राजेश रसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील वाघमारे यांनी केले.

