मद्याच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो झाला पलटी !
संजय कदम, पनवेल
मदयाच्या बाटल्यांनी भरलेला आयशर कंपनीचा टेम्पो एमएच १२ व्हीएफ ८१४९ खारघर येथे पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टेम्पोचे नुकसान झाले आहे.
एमएच १२ व्हीएफ ८१४९ हा टेम्पो जीएम मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स भरून वसई ते पुणे येथे जात होता. सायन पनवेल हायवे पनवेलच्या दिशेने जात असताना खारघर पोलीस स्टेशनच्या समोर या टेम्पोचे चाक फुटले आणि टेम्पो विरुद्ध दिशेला पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर मद्याच्या अनेक बाटल्या देखील फुटल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मध्यरात्री अपघात झाल्यानंतर एक रिक्षा चालक या मद्याच्या बाटल्या चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला हटकल्यानंतर तो बाटल्या टाकून रिक्षासह पळून गेला.




