सण साजरे करताना पेणकरांचे सहकार्य कौतुकास्पद – संदीप बागुल, पोलिस निरीक्षक

प्रतिनिधि, पेण
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे आमचे ब्रीदवाक्य असून चांगल्या कामाचे कौतुक करताना आनंद होत आहे. चुकीच्या कामांना थारा देणार नाही. चांगल्या कामासाठी मला नक्की बोलवा, माझ्या संपर्कात रहा. सहकार्य नेहमीच मिळेल. तसेच येणाऱ्या गणेशोत्सवात सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गोविंदा उत्सवात चांगले नियोजन करून शांतता व सुव्यवस्था राखत उत्सव साजरा करण्यात महत्त्वाची भुमीका बजावण्यात सहकार्य करणाऱ्या पेण शहरातील गोविंदा मंडळ यांचे प्रमुख, शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील यांचे आभार व्यक्त करण्यासाठी व गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पेण पोलिस ठाण्यात बैठक संपन्न झाली.
पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी प्रथन सर्वांचे आभार व्यक्त करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस निरीक्षक बेग, पोलीस निरीक्षक पोकले, शांतता कमिटीचे सदस्य एल के म्हात्रे, पत्रकार सुनील पाटील, विजय मोकल, देवा पेरवी, विनायक पाटील,दिनेश म्हात्रे, अनिल दरेकर, गिरीश शहा, डी के कांबळे, तसेच पोलीस पाटील व पोलीस सहकारी, गोपनीय निलेश ठाकूर, संजय वास्कोटी, माजी पोलीस अविनाश म्हात्रे यांच्यासह गोविंदा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एल के म्हात्रे व इतरांनी मार्गदर्शन करताना बहुमूल्य सूचना मांडल्या.



